इंग्रजी ई-निबंध स्पर्धा


पद्माशाली शिक्षण संस्था

ए.आर.बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर

इंग्रजी विभाग आणि आयक्यूएसी विभाग
आयोजित

इंग्रजी ई-निबंध स्पर्धा





जगभरात कोविड-१९ या महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वाढणारी रुग्णांची संख्या, त्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवकांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि कोविड-१९ कडे बघण्याचा युवकांच्या सकारात्मक विचारांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पद्माशाली शिक्षण संस्थेचे ए.आर.बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूरच्या इंग्रजी विभाग आणि महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी ई-निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेसाठी 
१. कोविड १९: द रोल ऑफ मास मीडिया 
२. कोविड १९: सोशियो-इकॉनॉमिक चालेंजेस 
३. कोविड १९- लॉकडाऊन: अ टाईम टू इन्ट्रोस्पेक्ट 
४. कोविड १९- लॉकडाऊन: इट्स पोजिटीव्ह इफेक्ट्स ऑन इनव्हायरमेन्ट आणि 
५. पेंडमीक क्राइसिस: लेसन्स फॉर द फ्युचर हे विषय दिलेले होते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पंजाब असे देशभरातून अनेक राज्यांमधून या स्पर्धेसाठी  एकूण ८६ निबंध प्राप्त झाले. या ८६ विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट ३ आणि २ उत्तेजनार्थ निबंध निवडण्यात आले. 

श्रेय गोसावी (व्ही.जि. वझे कॉलेज, मुलुंड) याने प्रथम, सुप्रिया यळमेली (ए.जी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, सोलापूर) हिने द्वितीय तर मनाली देसाई (मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) हे तृतीय विजेते ठरले असून प्रथम विजेत्यास १०००/-रोख व ई-प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्यास ५००/- रोख व ई-प्रमाणपत्र आणि तृतीय विजेत्यास ३००/- रोख व ई-प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे रोशनी डिसुझा (मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) आणि ईशा सरदगिकर (एन.बी.नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर) यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येकी २००/-रोख व ई- प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.  
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे सर यांनी विजेत्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख तसेच आयक्यूएसी विभागाच्या समन्वयक डॉ. अ‍ॅनी जॉन यांनी या स्पर्धेचे आयोजक म्हणून काम पाहिले.

डॉ.टी.एन.कोळेकर (दयानंद महाविद्यालय, सोलापूर), डॉ. रामराजा मोठे( सौ.सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैराग्य), डॉ.परमेश्वर सूर्यवंशी(माऊली महाविद्यालय, वडाळा), डॉ.सचिन लोंढे (के.एन.भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी), डॉ.सागर वाघमारे ( साठे माजविद्यालया, विलेपार्ले, मुंबई) आणि डॉ. सारंगपाणी शिंदे (आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा, सातारा) यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. प्रा. भाग्यश्री पाटील आणि प्रा. कमलाकर रुगे हे तांत्रिक समन्वयक म्हणून आपली भूमिका पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

Mikhail Bakhtin’s Dialogism and Intertextuality: A Perspective

DIASPORA: WRITING FROM THE MARGINS